कर विश्वासाचा गोळा
जा त्या दिशेने फेडत
निरस का बसला
संपला तो हारला
पंख पखेर या आशाला
जे आहे तुजपाशी
तू शोधतो कशाला ||१||
हि वाट ती सत्याची
न वावी मेल्यास्नी जित्याची
जा बाणासारखा त्या दिशेने
अंगी श्रम असे ज्याला
ओढ हवी ती अभ्यासाला
जे आहे तुजपाशी तु शोधतो कशाला ||२||
तु कधी न थको
ना तु कधी रुको
चालत राह असाच
मिळेल नवी वाट तुला
जे आहे तुजपाशी
तु शोधतो कशाला ||३||
सत्याच्या मार्गी जरी अशी काटे
हि ती अशी वाट आहे परी परी फाटे
तोड हे मौन सारे
ओळख काय ते खरे
पी विश्वासाचा प्याला
जे आहे तुजपाशी तु शोधतो कशाला.||४||