Wednesday 27 July 2011

तू शोधतो कशाला

कर विश्वासाचा गोळा 
जा त्या दिशेने फेडत 
निरस का बसला 
संपला तो हारला 
पंख पखेर या आशाला 
जे आहे तुजपाशी 
तू शोधतो कशाला ||१||

हि वाट ती सत्याची
न वावी मेल्यास्नी जित्याची 
जा बाणासारखा त्या दिशेने 
अंगी श्रम असे ज्याला 
ओढ हवी ती अभ्यासाला 
जे आहे तुजपाशी तु शोधतो कशाला ||२||

तु कधी न थको
ना तु कधी रुको 
चालत राह असाच 
मिळेल नवी वाट तुला 
जे आहे तुजपाशी 
तु शोधतो कशाला ||३||

सत्याच्या  मार्गी जरी अशी काटे 
हि ती अशी वाट आहे परी परी फाटे 
तोड हे मौन सारे 
ओळख काय ते खरे 
पी विश्वासाचा प्याला 
जे आहे तुजपाशी तु शोधतो कशाला.||४||

Wednesday 6 July 2011

प्रीतीचे वाटसरू

दिढी जडली त्या परिवरी 
जग वेगळे वाटे 
गार वारा सुटला मधात 
येई अंगावरी काटे ||१||

तुज विचार करता प्रियासी  
मन भांबावून जाये 
दिसे तू कधी , कधी न दिसे 
मी चोरून पाहे ||२||

प्रेम म्हणजे काय ग 
कळवू तुला कश्या शब्दात 
किती बोल माझेया मनी 
परंतु अंतकरण वादात ||३||

जगावेगळे प्रेम माझे 
करू कसे विस्लेषण त्याचे 
मनाशी आहे भीती कि 
नकार न येणार न माझ्या वाटे.||४||
तुजवीण जगावे हि माझ्या मने भीती 
कला गुण स्वम्पन  प्रिये 
तुझी काय करावी स्तुती ||५||

माझ्या प्रीतीची वाट तुजसाठी आहे
धाव घेऊ या वाटेने 
बनुनी प्रीतीचे वाट वाटसरू .||६|