Friday 26 August 2011

जननी

* जननी *

उष:त्काली निजून उठलो 
नभ आभाळी आभाळी 
त्यातून घेई मन एक उंच भरारी ||१||

पग पालवीत पक्षिया 
खेळी मी पाही 
मी एकटा येथे कोणीच नाही ||२||

उगाच वात सुटला मधून 
झटकन पक्षी गेलीया  उडून 
 मग चित्त त्यासंगे धाव घेई
सोबतीने दृष्टी कुटेही जाई||३||

डोही वाडावले पहिले जेव्हा 
विजेरी तंत्रावरी ,
चटकन कोसळता  खाली 
गवसला प्राण जमिनीवरी ||४||

चिव चिव करे पिले त्यायसी 
पंतू माय आता निजायलेसी
तोच आली चिंता माझे मनी
कोण करे सांभाळ शिवाय जननी ||५||

Tuesday 2 August 2011

परम ईश्वर

परम तुझी रूप 
परम आहे प्रार्थना 
तू आहे एकच 
करतो तुझी आराधना ||१||

अनेक रुपात पायी 
हा मानव तुला ईश्वरा 
कितीही असेल रूप 
तू आहे एकच खरा ||२||

दुख: दिले घातले 
जेव्हा जन्माला 
तूच कर निदान मुक्ती दे आम्हाला .||३||

भक्त रे झालो केव्हाच 
तुझ्या पायाशी जडलो मी
अर्पण तुला प्राण माझे 
हे भगवंता ||४||

परम मनी प्रथम 
श्री तुझा मान 
तूच विष्णू,ब्रम्हा,शिवा 
तुझ्यात सारेच अवधान ||५||