Saturday, 28 January 2012

तुझ्या प्रीतीचे दुख:

तुझ्या प्रीतीचे दुख : विसरू कसे
अप्रतिम तू प्रिये तुला कळवू कसे
मनातली जी काळरात्र
ती प्रकाशली तुझ्या देहाने
हि चमक तुझ्या नेत्रात जणू हिरा असे
तुला पाहता मन माझे उगाचच हसे ।।१।।

असे माझी जात जरी वेगळी तुझ्याशी
माझे प्रेम तुजवर , तुझ्या डोही पायाशी
जणू विजन पसरले माझे जीवनी
पाहुनी तुला हे माझे पद्मिनी
हे शरीर माझे तू आत्मा त्याची
हे आवाज माझे तू सरगम त्याची ।।२।।

तू फूल माझ्या बागेचे
तूच माझा प्राण वायू
तूच माझी मूर्ती ज्याला पुजतो मी
तू छळंली जी तार माझ्या हृदयाची
तेव्हाच जगली हि आस प्रेमाची
तू तीच माझी आराधना नेमाची
तुजवर प्रेम करतो तुला पुजतो
तुझ्या पायाशी जडलो मी ।।३।।

किती करतो प्रेम तुला ते कळवू कसे
मुखात शब्द तो मुखाशीच फसे
माझे प्रेम दिसे नेत्रात माझ्या
पण का न उतरे हृदयात तुझ्या ।।४।।

Increase your website traffic