म्या गेलो बँकेत
उचलायले चेक ,
सोबत व्हती बायकू
आणि चीमारूस लेक .
चेका मंदी व्हती साईन
मीन काही केली नाही,
मंग तेथी आली अडचण.
पुढच्याला मारला हाथ ,
आन पेन मांगली चटकन .
त्यो माने लवकर दे
मले भी कराची आहे ..
म्या मानलो आर भोड्या
घरी जाऊन मराच आहे .
मग पहा भाऊ राया
केली अशी साईन
पायल कर्मचार्याने
म्हणे पेऊन आला का वाईन.
म्या मानलो नाही रं बाबा .
तोच आला मांगून धक्का ,कहो
पायल त होता वृद्ध आबा .
झाले काहो पिसे म्हणे मले आबा
मले आला राग ,मणू एक देऊ कागा.
तेवढ्यात खवळले तेथले सारे लोक
काढल बँकेबाहेर म्याले ,मारू मारू झोक
हाथ जोडले बंकेले ,न येईन कधी येत .
गेलो होतो चांगल ,घरी आलो लाथा खात
No comments:
Post a Comment