दिसली ती स्वप्नात
बसली मनात
हसली गालात
आणि वृत्ती माझी खसली.||१||
स्नेह पल्लवे मजवर
माया अशी टाकली
दिधी हळुवारपणे
तिच्या कडे वकिली .||२||
मांडले विचार तिज पुढे
दिला तिने नकार
स्वमनाशी कुजबुजलो मी
का जडला मला हा विकार ||३||
एक दिस गाठ झाली मधरस्ती
होता शिरला तिच्या पायात काटा
मी विचारू पहिले असता
होकार तिचा राहला ||४||
प्रेमाचा हा स्पर्श
तिच्या पाउलावारी गेला
तिच्या हृदयात माझ्या
प्रेमाचा दिवा जळला||५||
प्रेमाची ती आठवण पहिली
काटा आजवरी जपून चालतो
आणि एकच सूत्र सांगतो
तिच्या पायाचा काटा
अन उजडल्या माझ्या प्रेमरुपी वाट .||६||
No comments:
Post a Comment