पदव्योत्तर झालो मी
आता थाट माझा वेगळा
लग्नाच्या या जाड्यात
अडकलो असा कि
उत्तर दिले , नाही
आणि घरी झाला झगडा ।।1।।
या झगड्याला आवरण्याच्या आशेत
मनात विचार केला पक्का
आता काही असो
करणार मी लग्न
मग कितीही बसो धक्का ।।2।।
मुलगी पाहिजे शिकलेली
सुंदर असणार तर अजूनच छान
अशी अट मी वडला समोर मांडली
ताई माझी माझ्यासोबत उगाचच भांडली ।।3।।
कसे बसे एक स्थळ
आणले माज्या काकांनी
छायाचित्र बघून तिचे
होकार दिले सगळ्यांनी ।।4।।
मग बघा कार्यक्रम
पाहण्याचा असा झाला
विहिरीत जाऊन डुबू कि काय
असा विचार मनात आला ।।5।।
पण तिच्या देहानी
हृदयात केली जागा
मन माझे फुलून गेले
सगळे काही विसरून गेले ।।6।।
जीवनात मिळाली आता मला साथ
घेऊन तिचा हातात हात
जड जीवन संपण्यास आले
आणि आता माझे लग्न झाले ।।7।।
No comments:
Post a Comment